Tag » Sai Baba

THOUGHT FOR THE DAY

Seek transformation and you will receive the information in the journey

Thought For The Day

Ganeshpuri 1977

In 1977 Das and I joined a large group of devotees from America for our first trip to India. We were to spend three months in Baba Muktananda’s ashram, Gurudev Siddha Peeth. 2.230 kata lagi

Devi Ma

My trustworthy inside source on Sathya Sai Baba

One of my best friends among all Indians and my closest confidante among all resident staff when I was a devotee of Sai Baba was V.K. 414 kata lagi

Sathya Sai Baba

Bestow Unique Sai Baba Items upon your loved ones!

The beautiful and unique sai baba items spreads positive and spiritual environment in our property. It could be an ideal option to decorate your house and office. 240 kata lagi

Sai Baba Statue Buy Online

कलातपस्वीच्या मदतीला कार्यकर्त्यांचा हात…

नव्या उमेदीने पुन्हा उभे राहणार प्रमोद कांबळे

ज्ञानपीठ पारितोषिक विजेते ख्यातनाम साहित्यिक वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांची ‘कणा’ ही कविता अधूनमधून वाचनात येत असते. पुरामुळे उद्ध्वस्त झालेलं घर सावरणाऱ्या व्यक्तीच्या अनुषंगाने कुसुमाग्रजांनी लिहिलेली ही कविता डोळ्यात पाणी आणल्यावाचून रहात नाही. कवितेचा शेवट करताना कुसुमाग्रज लिहितात…

‘कारभारणीला घेउन संगे सर आता लढतो आहे
पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे,
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेउन, तुम्ही फक्‍त लढ म्हणा! ’

नगरमधील सुप्रसिद्ध चित्रकार, शिल्पकार प्रमोद कांबळे यांच्या उद्ध्वस्त स्टुडिओला भेट दिल्यानंतर त्यांच्या डोळ्यात तोच आत्मविश्वास आणि तोच बाणा दिसला. ‘माझा स्टुडिओ जळला असला, तरीही माझी उमेद जळालेली नाही. ती कायम आहे. आज ना उद्या मी पुन्हा एकदा सर्व संकटांवर मात करून गरूडझेप घेईन आणि फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून कलाकृतींचा स्वर्ग निर्माण करेन, ’ असा दुर्दम्य विश्वास प्रमोद कांबळे यांच्याशी बोलताना जाणविला.

रविवारी दुपारी प्रमोद कांबळे यांचा नगरमधील स्टुडिओ जळून खाक झाल्यानंतर आम्ही कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेतली. त्यांच्या स्टुडिओला भेट देण्याची ही काही पहिली वेळ नव्हती. यापूर्वीही अनेकदा मी आणि साने गुरुजी तरुण मंडळाचे कार्यकर्ते स्टुडिओमध्ये गेलेलो. आयुष्याची पुंजी, सर्व मानसन्मान आणि कलाकृती काही क्षणांमध्ये जळून भस्मसात झालेल्या. अनेक शिल्प, मूर्ती, चित्र, मोल्ड्स आणि आयुष्यभर मेहनत करून तयार केलेल्या सर्व कलाकृतींची राख झालेली. पहावं तिकडे अग्नितांडवाचे अवशेष. तेव्हा आणि आताची परिस्थिती म्हणजे होत्याचे नव्हते झाल्यासारखी परिस्थिती. वैऱ्यावरही अशी वेळ येऊ नये. मात्र, कलावंताचं मन कणखर असतं, असं म्हणतात. त्याच कणखर मनानं प्रमोद कांबळे पुढे जात आहेत.

अनेकदा काही माणसं आपल्या आयुष्यात येतात आणि आपले मित्र बनून जातात हे आपण आपलं भाग्य समजलं पाहिजे. प्रमोद कांबळे त्यापैकीच एक. विलक्षण कलावंत माणूस. चित्र आणि शिल्पाच्या दुनियेचा राजा. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, साईबाबा, लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी यांच्यासह अनेक महापुरुषांना शिल्पांमधून जिवंत करणारे विलक्षण कलावंत… अनेक महापुरुष, राजकारणी आणि उद्योगपतींची चित्रांमधून बोलते करणारे सुप्रसिद्ध रंगरेषाकार… प्राण्यांची हुबेहूब निर्मिती करून बच्चे कंपनीला खूष करून टाकणारे शिल्पकार… पर्यावरणपूरक गणपतीबाप्पांची निर्मिती करण्यासाठी अनेक वर्षांपासून विविध शहरांमध्ये कार्यशाळा घेणारे सजग कलावंत… अशा अनेक रुपांमधून प्रमोद कांबळे आपल्याला भेटतात. मिसाइल मॅन आणि माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम, बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन, मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि अशाच अनेक मान्यवरांना आपल्या कलेच्या प्रेमात पाडणारे कलातपस्वी…

साने गुरुजी तरुण मंडळ आणि प्रमोद कांबळे यांचे अतूट असे नाते निर्माण झाले आहे. जवळपास आठ-दहा वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. त्यावेळी गणेशोत्सवादरम्यान काय देखावा करायचा, यासंदर्भात चर्चा सुरू होती. तेव्हा प्रमोद कांबळे यांनी तयार केलेल्या प्राणी-पक्ष्यांच्या प्रतिकृती गणपती बाप्पांसमोर मांडून अत्यंत आगळावेगळा आणि आकर्षक देखावा साकारण्याचा निर्णय आम्ही घेतला. प्रमोद कांबळे यांनीही त्याला अनुकूलता दर्शविली. त्यानंतर जे काही झाले ते केवळ अविस्मरणीय…

वहिनी आणि माजी नगरसेविका सौ. मनिषा धनंजय घाटे या मूळच्या नगरच्या. त्यांचे माहेर नगरचे. वहिनी त्या काळात साने गुरुजी तरुण मंडळाच्या कार्याध्यक्ष होत्या. जेव्हा गणेशोत्सवाला काय देखावा करायचा, अशी चर्चा सुरू झाली, तेव्हा वहिनींनी प्रमोद कांबळे यांच्याबद्दल माहिती दिली. खूप मोठे कलावंत आहेत. त्यांची मदत घेऊन काही देखावा करता येतो का पाहिले पाहिजे, असे वहिनींनी सुचविले. त्यानंतर प्रमोद कांबळे या कलातपस्वीची भेट झाली आणि एका भेटीचे रुपांतर दृढ अशा स्नेहामध्ये परिवर्तित झाले.

साने गुरुजी तरुण मंडळाची किर्ती पुणे शहरामध्ये सर्वत्र पसरण्यासाठी ते वर्ष खूप महत्त्वाचे ठरले. कार्यकर्त्यांची कल्पनाशक्ती, त्यांचे प्रयत्न आणि परिश्रम आहेतच. पण एखादी घटना, गोष्ट वेगाने घडण्यासाठी उत्प्रेरक किंवा कॅटॅलिस्ट लागतो, तो आमच्यासाठी प्रमोद कांबळे ठरले. प्राणीपक्ष्यांच्या देखाव्याला बच्चे कंपनी तसेच गणेशभक्तांनी दिलेला प्रतिसाद शब्दापलिकडचा होता. पुणे शहरातील माध्यमांनी, वृत्तपत्रांनी त्याची दखल घेतली. त्यामुळे प्रतिसाद वाढता वाढता वाढे… अशाच स्वरुपाचा होता. एका देखाव्यामुळे आपले मंडळ शहराच्या कानाकोपऱ्यात पोहोचले. तेव्हापासून आम्ही कधीच मागे वळून पाहिले नाही.

नंतर आमच्या मंडळासाठी त्यांनी तयार केलेल्या साईबाबांच्या ५१ फुटी मूर्तीमुळे आमचा स्नेह आणखी वाढला. साईबाबांची ५१ फुटी मूर्ती आणि छोटी आकर्षक मूर्ती इतकी अप्रतिम होती, जिवंत वाटत होती, की अनेकदा येणारे लोक म्हणायचे, की तुमच्या कॉलनीमध्ये खरंच साईबाबा रहायला आले आहेत, असं वाटतंय. हा कलावंत इतका महान. साईबाबांचा आशीर्वाद देतानाचा हात अशा काही पद्धतीने तयार केला होता, की साईबाबांचा वरदहस्त आपल्यावर आहेच, अशीच भक्तांची भावना निर्माण व्हावी. इतकी जिवंत मूर्ती निर्माण केल्यामुळे पुन्हा एकदा साईभक्तांची, गणेशभक्तांची गर्दी साने गुरुजी तरुण मंडळासमोर दिसत होती. अगदी मुंबई आणि महाराष्ट्राबाहेरूनही भक्त दर्शनासाठी येत होते. हा सर्व प्रमोद कांबळे यांच्या हातांचा महिमा. त्यांच्या कलेची जादू. प्रमोद कांबळे हा काय माणूस आहे, हे मी प्रत्यक्ष अनुभवलंय.

त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांची भव्य शिल्प लाइव्ह साकारण्याचा पराक्रम प्रमोद कांबळे यांनी माझ्या आग्रहाखातर आमच्या भागात केला होता. शिवजयंतीच्या निमित्ताने सणस स्पोर्ट्स ग्राउंडच्या चौकात छत्रपती शिवाजी महाराज उद्यानासमोर शिवरायांचे शिल्प साकारण्यात आले आणि डॉ. आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांचे शिल्प दांडेकर पूल चौकात निर्माण करण्यात आले. दोन्ही शिल्प इतकी जिवंत वाटत होती, की दोन्ही कलाकृती तेथून हलवू नयेत, अशीच नागरिकांची मागणी होती. कलावंत हा मनस्वी असतो. त्याला शांतता लागते. आजूबाजूला गोंधळ असेल, तर तो कलाकृती साकारू शकत नाही, वगैरे चर्चा फोल ठरविणारा हा कलावंत. ट्रॅफिकचा गदारोळ, नागरिकांचा आरडाओरडा आणि अत्यंत धावपळ अशा परिस्थितीत प्रमोद कांबळे यांनी साकारलेली शिल्प पाहिल्यानंतर मनुष्य आश्चर्यचकित झलाच म्हणून समजा.

कधी गणपती मंडळाच्या सजावटीसाठी हत्तींची सजावट, कधी जय मल्हारच्या मूर्तीसमोरील अश्व, विसर्जन मिरवणुकीतील छत्रपती शिवरायांची भव्यदिव्य मूर्ती आणि अशा अनेस प्रसंगांमधून आम्हा दोघांमधील स्नेह वाढतच गेला. छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील जिवंत वाटणारे प्राणी प्रमोद कांबळे यांनीच तयार केलेले. या कलावंताने कधी कोणत्या गोष्टीसाठी कुरकूर केली नाही. तक्रार केली नाही. कलाकृती निर्माण करण्यातच त्यांना आनंद असे.

अशा विलक्षण मनस्वी कलावंतावर कोणाच्या तरी क्षुल्लक बेफिकिरीमुळे संकट ओढवले आहे. आज गरज आहे त्यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहण्याची. व्यक्तिगत, आर्थिक, सामाजिक आणि सर्व स्तरांवर त्यांना मदतीची गरज आहे. साने गुरुजी तरुण मंडळ आज ठामपणे त्यांच्या पाठिशी आहे. त्यांना लागेल ती मदत करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. एक लाख रुपयांचा मदतीचा धनादेश मंडळाने तातडीने प्रमोद कांबळे यांच्या खात्यात जमा करत आहोत. आणखी लागेल ती मदत करण्यासाठी आम्ही तयार आहोत. माझी आणि प्रमोद कांबळे यांची भेट झाली तेव्हा मुख्यमंत्र्यांचे ओएसडी श्रीकांत भारतीय यांच्याशी त्यांचे बोलणे करून दिले. श्रीकांतजींनी सरकारच्या वतीने शक्य ती मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. सरकारने मदत करावी, यासाठी मी मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी संपर्क साधला होता. त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

प्रमोद कांबळे यांचे झालेले नुकसान नुकसान केवळ पैशांमध्ये मोजता येणारे नाही. तरीही आजच्या युगात पैसा हाच महत्त्वाचा आहे. पुन्हा उभं राहण्यासाठी सर्वाधिक महत्त्वाचा ठरणार आहे पैसा. आम्ही केलेली मदत तसं पाहता फार मोठी नाही. पण आजच्या क्षणाला एकेक रुपया महत्त्वाचा आहे. त्यामुळे आम्ही पुण्यातील दानशूर व्यक्ती, उद्योगपती आणि इतर सर्वांना भेटून प्रमोद कांबळे यांच्यासाठी मदतीचा हात पुढे करण्याचे आवाहन करणार आहोत. कलावंतांच्या पाठिशी मराठी माणूस कायमच ठामपणे उभा राहिला आहे. आज पुन्हा एकदा त्याची प्रचिती देण्याची गरज आहे, असे आम्हाला वाटते. म्हणूनच आम्ही सुरुवात केली आहे. आता सर्वांनी या यज्ञात सहभागी व्हावे, असे आवाहन दानशूर व्यक्तींना करत आहोत…

प्रमोदजी, आपण निश्चिंत राहा. संपूर्ण महाराष्ट्र आपल्या पाठिशी उभा आहे.

Sai Baba Rose Quartz Heart Locket Bracelet

A Bracelet Infused With Love

I love a challenge, but more so it was a joy and humbling to be asked to make a bracelet incorporating an image of a Guru that one of my friends loves and cherishes with all her heart. 445 kata lagi

Yoga

The Guru Supreme- The Role of a Master in one’s life (Part 1)

Right from our childhood, every person we crossed, has taught us something or the other, be it, when to speak and when not to speak; what to eat and what not to eat; how to be and how not to be. 1.117 kata lagi

Life